सिंहगडाहून सूर्यदर्शन….
दूर धूसर धुक्यात उमटले गिरीमालेचे तरंग !
शामल नभी कसे बहरले हे सुवर्ण केशरी रंग !
मज अभ्राचा शेला भासे , पहा चिरून आला सूर्य !
सिंहगडाहूनी गगन ढाली, स्मरते वीर तान्हाचे शौर्य !
नववर्षाच्या नव किरणांनी उजळून निघाली ही सृष्टी !
शिवप्रभूंच्या स्वराज्यावरती माझी खिळून राहिली दृष्टी !
@ सतीश ज्ञानदेव राऊत
नववर्ष दिन – १.१.२०२६






