Satish Raut: A Poet

नाळ

घट्ट पाश तुटताना वेदना होई दोघां !
नाळ चीरत जाताना हृदयी पडती भेगा !
नाते राहते चिरंतन जरी दूर होती देह !
क्षणभंगुर ती वेदना जाते, उरतो तो स्नेह !
किती काळ उदरात, पदरात किती काळ ?
वेळ येते निघण्याची दूर सोडून मागे नाळ !
जड पाऊले होती, घेता कातरवेळी निरोप !
सूर्य कसा विसरावा ? ज्याने दृष्टी दिली निकोप !
विरह अथवा वियोग हे जीवनाचे कटू सत्य !
केवळ नाते ते शाश्वत बाकी सारे मर्त्य !

@ सतीश ज्ञानदेव राऊत
२१ ऑक्टोबर, २०२५

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *