निश्चल
Satish Raut: A Poet

निश्चल…

खडा टाकला तरी.. ना उमटले तरंग, ना लागे थांग !
‘कसे इतके हे निश्चल पाणी ?’ तू मला सांग !
कधीच उसळत नाही का या पाण्यातून लाट ?
कितीदा स्पर्शून जात असेल हा चंचल वेडा वात !
कधी नसेल का स्वैर वाहिला या पाण्याचा पूर ?
घ्यावा का अनुभव मी , अज्ञाती मारून सूर !
किती असेल खोल पात्र ? काय असेल उदरात ?
दिव्य दिसेल का मला काही या अगम्य अंधारात !
कधी उकळी फुटून उष्म्याने होतं नसेल का वाफ ?
या घन गाभाऱ्यात सळसळणारा असेल ना एक साप !
मिटेल का तृष्णा माझी, पिऊनी पय निर्मळ !
कि ओठांच्या स्पर्शाने, विटाळेल का हे जळ ?
@सतीश ज्ञानदेव राऊत
०८.०७.२०२५

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *