आपण बऱ्याचदा ऐकतो …निखळ मैत्री !
पण …मैत्री निखळ नसणं म्हणजे
ती ओंगळ होत नाही !
ती पारदर्शीच का असावी ?
याउलट ती खोल , गुढ असावी !
तिला ठाव नसावा !
कारण आपला पारदर्शीपणा
इतरांसाठी उथळपणा असतो !
उगीच कुणीही त्यात डोकावतं !
त्यापेक्षा ती प्रवाही असावी …
म्हणजे कुठे मळभ साचत नाही की
ती गढूळ होत नाही !
पण तो प्रवाह सुप्त असावा
कातळातून झिरपणाऱ्या झऱ्यासारखा !
कधी निरव ठिकाणी मुक्त असावा ..
सांध्यसमयी झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखा !
तिथे भाव-भावनांचे तरंग उठावेत
नवे विचार- नवकल्पनांना नवे पंख फुटावेत !
मैत्री दिनी वाटते एकच प्रार्थना करावी ….
अशीच सर्वांची मैत्री बहरत रहावी !!
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!
@सतीश ज्ञानदेव राऊत





