Satish Raut: A Poet

महाकाय नृप

वडाच्या पारंब्यांवर पाण्याची धार !
जसा केसांत माळला मोत्यांचा सर !
गर्द पानांवरून ओघळे टपोरे मणी !
दाट जटांची कुणी बांधली वेणी !
जाड बुंध्याच्या डोई अफाट पसारा !
देई सावली जणां हा घनदाट पिसारा !
अंगाखांद्यावर झेली ऊन पावसाचा मारा ।
मुक्या जनावरांना हा एकची निवारा ।
लांब पारंब्यांची ओढ करी भुईला गर्भार !
खोल रुतून पारंब्या देती जीवाला आधार !
याच्या डोलीत पक्षी कधी कृमी, सरीसृप !
प्रजा सौख्यात नांदवी हा महाकाय नृप !

@सतीश ज्ञानदेव राऊत
०१.०७.२०२५

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *