Satish Raut: A Poet

झाली पहाट , उलटून गेली रात !

झाली पहाट , उलटून गेली रात !

तरी जग निद्राधीन , ह्या निरव प्रहरात !

नाही किलबिल पक्षांची या सर्द हवेत !

चलबिचल अधीर मनाची, शून्य रित्या कवेत !

बाहेर आलो अंगणी झोंबे बोचरा वात !

थिजले पाय माझे शाल भिजली दवात !

पडदा गडद रातीचा होऊ लागला धूसर !

नभी पुर्वेला अवतरली केशरी कलाकुसर !

‘ धावत जावे क्षितिजापार’ सणक भरली मनात !

पंख इच्छेचे अनिवार का नेईना मज क्षणात ?

फडफडले पंख पक्षांनी आता तडफडतो जीव !

काहीतरी करून बहाणा मी ओलांडतो शीव !

@सतीश ज्ञानदेव राऊत

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *