सुरू झाली परतीची वाट, सोडून पाऊलखुणा !
विसरून जा भुतकाळ तू , नको वळून पाहू पुन्हा !
जड होतील तुझी पाऊले, जडत्व येईल मना !
जरी फिरवली पाठ तू , ताठ राहील कणा !
तोंड तुझे मावळतीला, लांब सावली मागे !
ती ही सोडेल साथ तुझी , सूर्य मावळू लागे !
चंद्र नाही सोबतीला , अवसेचा अंधार दाट !
जपून टाक पाऊल पुढे, जरी सवयीची वहिवाट !
काही केल्या फिरकू नको, जिथून निघाले पाय !
उरले नाही काही तेथे , ना अडले तुज शिवाय !
@ सतीश ज्ञानदेव राऊत
३ ॲाक्टोबर , २०२५





